खाऊगल्ली | नान हा पदार्थ व्हेज- नॉन व्हेज भाज्यांबरोबर खाता येतो. तंदूरमध्ये बनवला जाणारा नान तव्यावर देखील बनवता येतो.
साहित्य –
१) २ कप मैदा
२) १\४ काप दही
३) १\२ चमचा बेकिंग सोडा
४) १ चमचे तेल
५) मीठ
६) पाणी
७) काळे तीळ
८) लसुण
९) कोथिंबीर
१०) बटर
कृती –
एका भांड्यात दही घ्या त्यात बेकिंग सोडा आणि तेल मिसळा. दह्यात मैदा, मीठ घालून नीट मिक्स करून घ्या. त्यात थोडे-थोडे पाणी मिसळून घट्ट गोळा करून घ्या. गोळा जास्त घट्ट किंवा पात्तळ नको. तयार केलेल्या गोळ्याला वरून तेल लावून ३-४ तास बाजूला ठेवा. थोड्या वेळाने गोळा परत मळून घ्या आणि त्याचे छोटे गोळे करा.
गोळे उभाच्या आकारात लाटून घ्यावे. त्याला वरून काळे तीळ, कापलेला लसूण आणि कोथिंबीर टाकावी, वरून एकदा लाटणे फिरवून घ्या त्यामुळे ते सर्व नीट चिकटून राहते. लाटले नान गरम तव्यावर थोडे शेकून घ्या, नंतर गॅसच्या आचेवर दोनी बाजूनी चांगले भाजा. वरून बटर लावा. तयार आहे बटर नान.