हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजवर तुम्ही अंगणात लावलेल्या रोपांची काळजी घेण्यासाठी आणि त्या रोपांच्या वाढीसाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले असतील. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, रोपांची चांगली लागवड होण्यासाठी ताकाचा देखील वापर केला जाऊ शकतो. ताक हे फक्त मानवाच्या आरोग्यासाठी नाही तर रोपांच्या आरोग्यासाठी ही फायदेशीर ठरते. ताकाचे खत रूपांना घातल्यामुळे रूपांची चांगल्या पद्धतीने वाढ होते आणि रोपे कधीही सुकत नाहीत. त्यामुळेच हे ताकाचे खत (Buttermilk Fertilizer) कसे बनवायचे आजच्या लेखात माहिती करून घ्या.
ताकाचे खत बनवण्याची पद्धत
ताकाचे खत बनवण्यासाठी सर्वात प्रथम एका भांड्यात एक ग्लास ताक घ्या, तसेच एक ग्लास नारळाचे पाणी, एक चमचा हळद, अर्धा चमचा हिंग , थोडा फळांचा रस आणि एक लिटर पाणी यांचे मिश्रण करा. त्यानंतर हे मिश्रण रोपांवर वापरा. तुम्ही तुमच्या अंगणात किंवा घरामध्ये छोटी मोठी रोपे लावली असतील तर त्यावर या ताकाच्या खताचा चांगला परिणाम दिसून येईल. तसेच तुम्ही लावलेले रोपे कधीही पिवळी पडणार नाही. ताकामध्ये अनेक पोषक तत्वे असतात त्यामुळे झाडांना नवीन ऊर्जा मिळते.
ताकाच्या खताचे फायदे
रोपांसाठी ताकाचे खत वापरल्यामुळे रोपे चांगल्या पद्धतीने वाढतात. तसेच झाडाची मुळे मजबूत होतात. झाडांना पोषक त्याचे वेळ मिळतात. ताक वापरल्यामुळे माती पोषक द्रव्ये चांगल्या पद्धतीने शोषून घेते. ताकामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम असल्यामुळे झाडे निरोगी राहतात. तसेच ती हिरवीगार दिसतात.
ताकाचे खत रोपांना कसे घालावे
तुम्ही तुमच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये कुंडीत रोपे लावली असतील तर ताकाच्या खताची त्यावर फवारणी करावी. तसेच झाडांना पाणी देण्याअगोदर देखील हे ताकाचे खत फवारू शकता. सुरुवातीला अधिक प्रमाणामध्ये हे खत झाडांवर फवारू नये अन्यथा यामुळे झाडे जळू देखील शकतात.