30 हजारात खरेदी करा Honda ची दमदार Bike; कुठे आहे ऑफर?

Honda SP 125
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । टू-व्हीलर सेक्टरमध्ये कमीत कमी पैशात जास्त मायलेज देणाऱ्या अनेक गाड्या आहेत. खिशाला परवडणारी आणि जास्तीत जास्त फायदेशीर अशी गाडी खरेदी करण्याकडे सर्वसामान्य ग्राहकांचा कल असतो. आजच्या मार्केट मध्ये Honda SP 125 ही बाईक खूप प्रसिद्ध आहे. ही बाईक तिच्या उत्कृष्ट डिझाइन आणि मजबूत मायलेजमुळे देखील लोकप्रिय आहे.

कंपनी Honda SP 125 दोन प्रकारांमध्ये विकते. या बाईकची बेस किंमत 83,522 रुपये असून टॉप व्हेरिएंटची किंमत 87,522 रुपये आहे. त्यामुळे ही बाईक खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे 90 हजार रुपये असणे आवश्यक आहे. पण तुमच्याकडे तेवढे बजेट नसेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही ही बाईक सेकंड हँड मार्केटमध्ये अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता.

कुठे मिळेल सेकंड हॅन्ड Honda SP 125

तुम्ही कमी बजेटमध्ये सेकंड हँड Honda SP 125 बाइक खरेदी करणार असाल तर तुम्ही पहिला पर्याय म्हणून ड्रूमच्या वेबसाइटवर पाहू शकता. येथून तुम्ही या बाईकचे 2018 मॉडेल 30,000 रुपयांना खरेदी करू शकता. या वेबसाइटवर तुम्हाला फायनान्स प्लॅनचा पर्यायही मिळेल.

OLX वेबसाइटवर सुद्धा जुनी वापरलेली Honda SP 125 उपलब्ध आहे. येथून तुम्ही 2018 चे मॉडेल फक्त 33,000 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्हाला येथे फाइनेंस प्लॅन मिळणार नाही.

Honda SP 125 सेकंड हँड मॉडेलचा तिसरा पर्याय बाइक्स फॉर सेल वेबसाइटवर उपलब्ध आहे. या वेबसाइटवर तुम्ही दिल्ली नोंदणीकृत 2019 मॉडेल फक्त रु.40,000 मध्ये खरेदी करू शकता.

टीप: कोणतीही सेकंड हँड बाईक घेण्यापूर्वी, बाईकची नीट माहिती करून घ्या, बाईकचे इंजिन, बॉडी सर्वात महत्वाचे म्हणजे म्हणजे कागदपत्रे तपासा.

दरम्यान, Honda SP 125 तिच्या उत्कृष्ट डिझाइन आणि मजबूत मायलेजमुळे लोकप्रिय आहे. या गाडीच्या इंजिन आणि ट्रान्समिशनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने या बाईकला 123.94 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 10.8 पीएस पॉवर आणि 10.9 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. Honda SP 125 च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक 65 किलोमीटर प्रति लीटर एवढा मायलेज देते