हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – फ्लिपकार्ट इयर एंड सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर सूट मिळत आहे, परंतु एक ऑफर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेषत: आयफोन प्रेमींसाठी हि ऑफर आहे. यामध्ये महागडा 5G iPhone फक्त 20,499 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. होय, हे स्वप्न नसून वास्तव आहे. सेलमध्ये आयफोन घेण्याचे तुमचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते, तेही कमी किमतीत चला तर मग जाणून घेऊया आयफोनच्या ‘या’ उत्तम ऑफरबद्दल…..
5G iPhone 22 हजारमध्ये मिळत आहे
वास्तविक, iPhone 12 mini 5G सध्या फ्लिपकार्टवर बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. येथे आम्ही तुम्हाला फोनच्या 64 जीबी स्टोरेज वेरिएंटवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल सांगत आहोत. 59,900 रुपयांच्या MRP सह हा लहान आकाराचा 5G iPhone Flipkart वर 21,901 रुपयांच्या सवलतीसह फक्त 37,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरून फोन खरेदी केल्यास 5% सवलत मिळू शकते. मोफत म्हणून, OTTplay प्रीमियम सबस्क्रिप्शन फोनवर फक्त 1 रुपयात उपलब्ध आहे, ज्यामध्ये SonyLIV, Zee5, Lionsgate Play, ShemarooME, ShortsTV यांचा समावेश आहे. फ्लिपकार्ट फोनवर 17,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. म्हणजेच, जर तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असेल तर तुम्ही iPhone 12 mini 5G वर 17,500 रुपयांची अतिरिक्त सूट घेऊ शकता. समजा तुम्हाला फुल एक्स्चेंज बोनसचा फायदा मिळाला तर तुम्ही 20,499 रुपयांना फोन खरेदी करू शकता. 5G iPhone साठी वाईट डील नाही.
iPhone 12 mini 5G मध्ये काय आहे खास ?
फोनमध्ये 5.4-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले, A14 बायोनिक चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे आहेत आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये अनेक मोड्सचा सपोर्ट उपलब्ध आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!