“देवेंद्रजींनी एक लवंगी फटाका फोडला तर आदित्य-उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील”; राणा दांपत्यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुटली बॉम्बचे ट्विट केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘बॉम्ब’वरून दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. याबाबत खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. “आम्ही जर बॉम्ब फोडला तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील तसेच संजय राऊत दिसणारही नाहीत,” असे नवनीत राणा यांनी म्हंटले आहे.

नवनीत राणा व रवी राणा यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर व संजय राऊतांवर हल्लाबोल केला. रवी राणा म्हणाले की, संजय राऊतांनी विदर्भात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये. त्यांचे आधीच 40 आमदार गेले हा बॉम्ब फुटला आहे. अडीच वर्षात काय काम केलं हे दाखवावं मी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बक्षिस देईन.

नवनीत राणा म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीसांनी जरी लवंगी बॉम्ब फोडला तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे दिसणार नाहीत. पण देवेंद्र फडणवीसांना कोणाचा बॉम्ब काढण्यात रस नाही. काम करताना प्रत्येकाकडून चुका होतात जर आम्ही सुरू केलं तर खूप भारी पडेल. विदर्भात काय कामं केली हे संजय राऊतांनी सांगावं. त्यांनी जर काम सांगितली तर मी माझी सगळा पगार देईल. देवेंद्र फडणवीस यांना या बॉम्ब फोडाफोडीमध्ये रस नाही. ते विदर्भाचा विकास कसा होईल ते पाहतात. विरोधी पक्षानं जे काही करायचं ते बाहेर येऊन करावं, असे नवनीत राणा यांनी म्हंटले.