आत्ताच खरेदी करा एसी, फ्रीज आणि पंखे; लवकरच दर वाढण्याची शक्यता

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । उन्हाळ्यात एसी, रेफ्रिजरेटर आणि पंखा घेण्याचा विचार करत असाल तरलवरच खरेदी करा.. याचे कारण म्हणजे वाढत्या खर्चामुळे कंपन्या येत्या काही दिवसांत त्यांच्या किंमती वाढवण्याचा विचार करत आहेत. खरे तर रशिया-युक्रेन युद्धामुळे तांबे, अ‍ॅल्युमिनिअमच्या किंमती जागतिक बाजारपेठेत विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्याचा भर एसी, फ्रीज आणि पंखे बनवणाऱ्या कंपन्यांवरही पडत असून, वाढीव किंमत वसूल करण्यासाठी येत्या काही दिवसांत त्यांच्या किंमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढू शकतात. गेल्या दोन वर्षांत कंपन्यांनी तीनदा किंमती वाढवल्या आहेत.

वर्षभरात दीडपट खर्च वाढला
जागतिक बाजारपेठेत अ‍ॅल्युमिनियम आणि तांब्याच्या किंमती गेल्या वर्षभरात दीड पटीने वाढल्या आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अ‍ॅल्युमिनियमची किंमत 1.61 लाख रुपये प्रति टन होती, ती आता 2.80 लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे तांब्याचे भावही प्रति टन 5.93 लाख रुपयांवरून 7.72 लाख रुपये प्रति टन झाले.

कंपन्या घटत्या मार्जिनचा हवाला देत आहेत
ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत ते त्यांचे मार्जिन कमी करून काम करत होते, मात्र वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे आता ते शक्य नाही. गेल्या दोन वर्षांत उत्पादनांच्या किंमती 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता दिसून येते. उत्पादन खर्च आणि बाजारभाव यामध्ये 10 टक्के तफावत आहे, ती भरून काढण्यासाठी किंमत वाढवणे आवश्यक झाले आहे.

महामारी आणि महागाईचा दबाव
कंपन्यांना अजूनही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती आहे ज्यामुळे ते पुरेसे उत्पादन करू शकत नाहीत. याशिवाय क्रुडच्या वाढत्या किंमतींमुळे पेंट आणि प्लॅस्टिकसारखी उत्पादने डायरेक्ट महाग होत आहेत. त्याचा परिणाम ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सच्या उत्पादनावरही दिसून येत आहे. इंधनाच्या महागाईमुळे मालवाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे एकूणच कंपन्यांवर उत्पादन खर्च वाढल्यास त्याचा बोझा ग्राहकांवर पडणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here