Tuesday, January 31, 2023

‘एवढ्या पैशात तर श्रीलंका विकत घ्याल’; एलन मस्कच्या ट्विटर खरेदीच्या ऑफरवर जोक होतायंत व्हायरल

- Advertisement -

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एलन मस्कने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्यासाठी 43 अब्जची ऑफर दिली होती त्यामुळे त्यांच्या या ऑफरमुळे ट्विटरवर अनेक जोक्सही व्हायरल होत आहेत. असाच एक विनोद सध्याचे श्रीलंकेवरील कर्ज आणि एलन मस्क ट्विटरला दिलेल्या ऑफरची तुलना करतानाच विनोद पाहायला मिळत आहे.

वास्तविक, श्रीलंकेवर 45 अब्ज डॉलरपेक्षा जास्त कर्ज आहे आणि तिथले सरकार ते फेडण्यास असमर्थ असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत ट्विटरवर लोकं मस्क यांना सल्ला देत आहेत की, ट्विटरऐवजी त्यांनी श्रीलंकेचे कर्ज फेडून हा देश विकत घ्यावा.

- Advertisement -

kunal behl

तेव्हाच सिलोन मस्क होईल
स्नॅपडीलचे सीईओ कुणाल बहल यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये, ते मस्कने ट्विटर आणि श्रीलंकेचे कर्ज खरेदी करण्यासाठी केलेल्या $43 अब्ज ऑफरची तुलना करत आहे. त्यांनी लिहिले आहे की, श्रीलंका खरेदी केल्यानंतर मस्क स्वत:ला सिलोन मस्क म्हणू शकतात. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यापूर्वी श्रीलंकेला सिलोन म्हणून ओळखले जात असे.

मात्र, अनेकजण याबाबत नाराजही आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, जर एक माणूस संपूर्ण देश विकत घेऊ शकत असेल तर यावरून लोकांमध्ये किती मोठा आर्थिक फरक आहे हे दिसून येते. ही एक मोठी समस्या आहे.

एलन ट्विटर ताब्यात घेण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे
एलन मस्कने ट्विटर विकत घेण्यासाठी 43 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली आहे. त्याचवेळी, ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्स नुसार, मस्ककडे एवढी कॅश रक्कम नाही. याचा अर्थ असा की, तो एकतर हे पैसे दुसऱ्याकडून कर्ज म्हणून घेईल किंवा टेस्लामधील मोठा हिस्सा विकेल. मस्क ट्विटर विकत घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र ट्विटरच्या आणखी एका मोठ्या शेअरहोल्डरने मस्कची ऑफर नाकारली आहे. विशेष म्हणजे, ट्विटरमध्ये मस्कची अजूनही 9 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे, मात्र ते या कंपनीचा सर्वात मोठा भागधारक नाहीत.