हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या घडीला अमेरिकेतील शेअर बाजारामध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा सकारात्मक परिणाम भारताच्या शेअर बाजारावरही (Indian Share Market) पडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला Jupiter Hospitals, Coal India, Ambuja Cements, ACC, Federal Bank या कंपन्यांचे स्टॉक्स चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण या स्टॉक्समध्ये (Stock) दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास 30 टक्के परतावा मिळेल, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळेच आज आपण या स्टॉक्सविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
1) Jupiter Hospitals – Jupiter Hospitals शेअर खरेदी केल्यास 1,585 रुपये प्रति शेअर असे ठेवावे. कारण की, यामुळे गुंतवणूकदाराला स्टॉक 30 टक्क्यांनी रिटर्न्स मिळेल. गेल्या 3 मे रोजी या शेअरचा भाव 1214 असा सुरू होता. त्यामुळे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांनी या शेअरचा विचार करावा.
2) ACC – या कंपनीचे स्टॉक्स खरेदीसाठी चांगला पर्याय आहेत. तुम्ही हे स्टॉप खरेदी करत असाल तर सुरुवातीला टारगेट प्राईज 3119 रुपये प्रति शेअर ठेवा. यासह वर्षभरासाठी तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 23 टक्के रिटर्न्स मिळतील.
3) Federal Bank – या बँकेचे स्टॉक कमी खरेदी करताना टार्गेट प्राईज 195 रुपये प्रति शेअर इतकी ठेवावी. यात जर तुम्ही वर्षभरासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 18 टक्के रिटर्न्स दिले जाईल.
4) Coal India – पहिल्यांदाच स्टॉक्स खरेदी करत असाल तर Coal India चे स्टॉक चांगला पर्याय आहे. सुरुवातीला कंपनीच्या या स्टॉक्समध्ये टार्गेट प्राईस 537 रुपये इतके ठेवावे. या स्टॉकमध्ये वर्षभरासाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला 13 टक्के रिटर्न्स मिळेल.
5) Ambuja Cements – या कंपनीचे स्टॉक्स देखील खरेदीसाठी चांगला पर्याय आहेत. सुरुवातीला या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास टार्गेट 767 रुपये प्रति शेअर असे ठेवावे. तसेच वर्षभरासाठी या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास 23 टक्के रिटर्न तुम्हाला मिळेल.