जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या 185 जागांसाठी पोटनिवडणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतीमधील 185 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी 21 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे आकस्मिक निधन, राजीनामा, अपात्र ठरल्याने रद्द झालेले सदस्यत्व आणि अन्य कारण रिक्त झालेल्या सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या 128 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवडणुक आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीसाठी इच्छुकांनी 30 नोव्हेंबरपासून 6 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबरला छाननी होणार आहे. अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

तर 21 डिसेंबरला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मदतान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.

Leave a Comment