कराड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक बिनविरोध, आठसाठी रणागंण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका लागल्या असून, 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आठ ग्रामपंचायतीच्या जागा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली.

तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यासाठी आज अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत होती. त्या अखेरच्या दिवशी तालुक्यातील गणेशवाडी, डेळेवाडी, घोलपवाडी, करंजोशी, पाचुपतेवाडी, कचरेवाडी, यादववाडी, तारुख, आणे, शिंदेवाडी- विंग, शेळकेवाडी, अंबवडे, पाचुंद या 13 ग्रामपंचायतींसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने त्या जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील वानरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, चिंचणी, घराळवाडी, हवेलवाडी, शिंगणवाडी, भरेवाडी या ग्रामपंचायतींच्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत, तर शेळकेवाडी- येवती, शितळवाडी, जुजारवाडी, मुनावळे, लटकेवाडी, शेवाळवाडी- उंडाळे, हरपळवाडी, खोडजाईवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यासाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे.