लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ शूट करून….; अमरावतीत धक्कादायक प्रकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दोन अल्पवयीन मुलांना अश्लील कृत्य करायला लावून त्यांचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडिया वर व्हायरल करण्याचा धक्कादायक प्रकार अमरावती येथे घडला आहे. यासंदर्भात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात हा घृणास्पद प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

तक्रारीनुसार, साधारणत: आठ दिवसांपूर्वी तीनही संशयितांनी खेळत असलेल्या त्या मुलांना बोलावून नवीन व्हिडिओ बनविण्याची बतावणी केली. तथा अश्लील कृत्य करण्यास सांगून ते मोबाईलमध्ये चित्रित केले. ते तिघेही संशयित तेवढ्यावरच न थांबता त्यांनी तो अश्लील व्हिडिओ बऱ्याच लोकांच्या मोबाईलवर पाठवून व्हायरल केला.

या किळसवाण्या घटनेमुळे दोन्ही बालकांच्या मनात भीती दाटून आला आणि मूले भयग्रस्त झाली आहेत. हा धक्कादायक प्रकार पीडित बालकांच्या पालकांना माहित होताच त्यांनी तिवसा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करुन तिघांनाही अटक केली आहे.