ऑगस्टच्या अखेरीस पूर्ण होईल 25 जलकुंभाचे काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन पाणी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी 25 जळकुंभाचे काम ऑगस्ट च्या शेवटच्या टप्प्यात होईल असे सांगितले आहे. आता या कामासाठी लवकरच गती येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

1 हजार 680 कोटी रुपयांच्या या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे. ही योजना राज्य शासनाने शहरातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी मंजूर केली आहे. अधिकाऱ्यांनी या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन जीव्हीपीआर या कंपनीला काम दिले आहे. फेब्रुवारीमध्ये कंपनीला कार्यादेश देण्यात आला होता. आणि मार्चपासून कंपनीने हे काम सुरू केले आहे.

या योजनेच्या माध्यमातून नवीन 50 जलकुंभ बांधले जाणार आहेत. त्याचबरोबर नक्षत्रवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र आणि दोन संतुलित जलकुंभाचे काम सूरु झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचे उदघाटन झाले होते. पाणी पुरवठा योजनेचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट शासनाने ठरवून दिले आहे. त्याचबरोबर शहरात आणि ज्या परिसरात रस्त्यांची कामे सुरू आहेत ,त्या ठिकाणी वेळ न घालवता जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. व्हीएनआयटीने सर्वच जलकुंभांचे आराखडे मंजूर करुन पाठवले असून संस्थेचे एक पथकही शहरात आले होते. त्यांनी जलकुंभांच्या जागांची पाहणी केली. किमान २५ जलकुंभांचे काम ऑगस्ट अखेरपर्यंत सुरु व्हावे असा आमचा प्रयत्न आहे. असं अधीक्षक अभियंता अजयसिंह यांनी सांगितले

Leave a Comment