औरंगाबाद – कोरोनाचा नवा व्हरिएंट ओमायक्रोनचा धोका वाढल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने गर्दीवर नियंत्रण आणले होते. त्यामुळे हॉटेल्स 50 टक्के टेबल क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी परवानगी होती. ही बंधने मागे घेत आजपासून जिल्ह्यातील हॉटेल्स च्या वेळा वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मंगळवारी हॉटेल असोसिएशनची बैठक मुंबई झाल्यानंतर जिल्ह्यात पर्यटन वाढीस उद्योगवृद्धी व बेरोजगारी कमी करण्यासाठी हॉटेल्सच्या वेळा रात्री अकरा वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. हॉटेल्सच्या वेळा वाढवण्याची मागणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे 26 जानेवारी रोजी केली होती.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, अकरा वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी देण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी झाली. 50 टक्के टेबलवरच फुड सर्विस देण्याचे निर्बंध कायम ठेवले आहेत. वेळ वाढविण्यात आल्या मुळे गर्दी कमीच राहील तसेच अकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी जरी असली तरी त्यानंतर फक्त अर्धा तास कर्मचारी सोडणे, साफसफाईच्या कामासाठी शिथिल म्हणून ग्राह्य धरला जाईल. त्यानंतर नियमांचे उल्लंघन झाले तर कारवाई केली जाईल.