भारताने बंदी घातल्यानंतर चिनी कंपनी ‘TikTok’ऍप विकण्याच्या विचारात

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारताने TikTok सोबत अन्य ५९ चिनी ऍप्स भारतात बॅन केले होते. अमेरिका देखील चिनी ऍप्स बॅन करण्याचा विचार करत असल्याचं समोर येत आहे. एवढचं नाही तर पाकिस्तानात देखील TikTok बॅन करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, जगातील वातावरण पाहता चिनी कंपनी Bytedance लवकरच TikTok ऍप विकण्याचा निर्णय घेवू शकते.

व्हाईट हाऊसने देखील यावर अंदाज वर्तवला आहे. चिनी कंपनी Bytedance स्वतःला वाचवण्याकरता वादग्रस्त TikTok ऍप विकण्याची शक्यता आहे. असं मत अमेरिकेचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो (Larry Kudlow) यांनी वर्तवलं आहे.

‘आम्ही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. परंतु ज्याप्रकारे TikTokच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. ते पाहता Bytedance लवकरच TikTok ऍप विकण्याचा निर्णय घेवू शकते. TikTok ऍपवर बंदी घातल्यामुळे Bytedance कंपनीसोबत चीनला देखील मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचं लॅरी कुडलो यांनी सांगितलं. एकंदर या सर्व गोष्टींचा परिणाम TikTok ऍपला चांगलाच सहन करावा लागत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”