CAA विरोधात विधानसभेत ठराव घ्या; केरळच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली,पुडुचेरीसह 9 राज्यांना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : केरळ राज्याने नुकताच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर केला. या पार्श्वभूमीवर आता भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांनी अशाच प्रकारचा ठराव विधानसभेत मंजूर करावा असे आवाहन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले आहे. त्यांनी बिगर भाजप शासित राज्यांना पत्र लिहून हे आवाहन केले आहे. पिनराई विजयन म्हणाले की,”सीएए रद्द करावा, असे मत असणारी राज्ये विधानसभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात प्रस्ताव मंजूर करण्याचा विचार करू शकतात.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी झारखंड, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, पुडुचेरी, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे. या केंद्रशासित प्रदेशामध्ये गैरभाजपा सरकार आहे. त्यामुळे या केंद्रशासहित प्रदेशांना देखील पत्र पाठविण्यात आले आहे.