हॅलो महाराष्ट्र । भारतात नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी लागू करण्याचा विचार केला तर ती देशाची दुसरी फाळणी ठरेल अशी भीती शशी थरुर यांनी व्यक्त केली आहे. जयपूर साहित्य संमेलनात ते बोलत होते.
“वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू झाल्यानंतर जीना पूर्णपणे जिंकले आहेत, असं मी म्हणणार नाही. तर पण मी म्हणेन जिना जिंकत आहेत. तरीसुद्धा अद्याप देशाकडे जीनांची राष्ट्र कल्पना किंवा गांधीजींची राष्ट्र कल्पना निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सीएए कायदा हा जिनांचा धर्माधिष्ठीत राष्ट्र संकल्पनेचा पुरस्कार करणारा आहे, तर गांधीजींची संकल्पना ही सर्व धर्म समभाव अशी आहे.” असं थरुर म्हणाले.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा
हे पण वाचा-
कोल्हापुरात शिवभोजन योजनेला सुरुवात; मंत्री सतेज पाटीलांनी शिवथाळीचा घेतला आस्वाद
विधानपरिषद बरखास्तीचा आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय; विधानपरिषदेत संख्याबळ नसल्यामुळे घेतला निर्णय?
मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा – राज ठाकरे