Cabinet Decisions : केंद्र सरकारच्या ‘या’ मोठ्या निर्णयामुळे लाखो लोकांना मिळणार रोजगार, त्याविषयी अधिक तपशील जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑटो, ऑटो पार्ट्स आणि ड्रोन उद्योगासाठी 26,058 कोटी रुपयांच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह (PLI) योजनेला मंजुरी दिली. ही माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,”या PLI योजनेचा उद्देश देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्मिती करणे हा आहे. या निर्णयामुळे 7.6 लाखांहून अधिक लोकांना अतिरिक्त रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.”

केंद्रीय मंत्री म्हणाले की,”केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 26,058 कोटी रुपयांच्या PLI योजनेला मान्यता दिली. PLI योजना भारतातील प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाच्या जागतिक पुरवठा साखळीच्या विकासाला प्रोत्साहन देईल.”

ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की,”उद्योगांना पाच वर्षांत 26,058 कोटी रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल.” ते म्हणाले की,”PLI योजनेअंतर्गत, पाच वर्षांमध्ये 42,500 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक आणि 2.3 लाख कोटी रुपयांची वाढीव निर्मिती होईल.”

केंद्रीय मंत्री म्हणाले की,”ड्रोनसाठी PLI योजनेमध्ये 5 हजार कोटींपेक्षा जास्त नवीन गुंतवणूक तीन वर्षात येण्याची अपेक्षा आहे. यावरून असे दिसते की, ते 1500 कोटींपेक्षा अधिक वाढीव उत्पादन आणेल.”

दूरसंचार क्षेत्रात 100% FDI मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी PLI योजना मंजूर करण्याव्यतिरिक्त, सरकारने दूरसंचार क्षेत्रात 100% FDI ला परवानगी दिली आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Leave a Comment