Cabinet Meeting: ऑटो PLI योजनेसाठी मंत्रिमंडळाची मान्यता, इलेक्ट्रिक वाहनावर विशेष भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ऑटो PLI योजनेवर निर्णय घेण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये ऑटो PLI योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. CNBC AWAAZ च्या बातमीनुसार, ऑटो कम्पोनंट बनवणाऱ्या कंपन्यांना 26 हजार कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. या योजनेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांवर विशेष भर देण्यात आल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे.

त्याचवेळी, कॅबिनेट बैठकीपूर्वी आज सकाळपासून ऑटो स्टॉकमध्ये खरेदी दिसून आली. याआधीच हे अपेक्षित होते की, सुमारे 26 हजार कोटींची PLI योजना मंजूर होऊ शकते. यासोबतच इलेक्ट्रिक वाहनांवरही विशेष भर देण्यात आला.

ड्रोन क्षेत्रासाठी देखील PLI योजनेबाबत विचार
बैठकीत घेतलेल्या निर्णयाची औपचारिक घोषणा आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत केली जाऊ शकते, पण सूत्रांनुसार, ड्रोन क्षेत्रासाठी PLI योजनेचाही बैठकीत विचार करण्यात आला आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असे मानले जात आहे की, ड्रोन निर्मितीसाठी PLI योजनेवर चर्चा झाली आहे. तसेच ड्रोन आणि ड्रोन इक्विपमेंट कंपन्यांना इंसेन्टिव्ह देणे देखील शक्य आहे.

PLI योजनेव्यतिरिक्त, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रिमंडळाकडून दूरसंचार क्षेत्रासाठी मदत पॅकेज मंजूर करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक टेलिकॉमर्सना AGR पेमेंटसाठी स्थगिती मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment