हॅलो महाराष्ट ऑनलाईन Cable Bus । देशात मागच्या काही वर्षात इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठे बदल झाले आहेत. नवीनवीन रस्ते, गाड्या आणि रेल्वेमुळे प्रवास करणं सोप्प जात आहे. आता पर्यावरण पूरक प्रवासाकडे सरकारने भर दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतात लवकरच केबल बसेस सुरु होणार आहेत. देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत थेट घोषणा केली आहे. देशातील वाहतूक प्रदूषणमुक्त करणे हे या योजेमागील मुख्य उद्दिष्ट आहे. या केबल बस मध्ये एकाच वेळी किती प्रवासी बसू शकतात? सुरुवातीला ती कोणत्या शहरातून धावेल? याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात.
नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल कि, सरकार लवकरच देशातील अनेक शहरांमध्ये रोपवे केबल बस (Cable Bus) सुरू करू शकते . जेणेकरून स्वच्छ भविष्यातील गतिशीलतेच्या दिशेने हे सरकारचे एक मोठे पाऊल मानले जात आहे. भारत सरकारच्या शहरी विकास आणि परिवर्तन अभियानांतर्गत केबल बसेस एक मैलाचा दगड ठरू शकते. सध्या मोठ्या शहरांमध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी पुरेशी नाही.तर दुसरीकडे रस्त्यांवर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बस चालवणे कठीण होत आहे. अशावेळी रोपवे केबल बस सुरू झाल्यास अनेक शहरांना वाहतूक कोंडी आणि प्रदूषणापासून मुक्तता मिळू शकते.
नितीन गडकरी यांच्या मते, देशभरात ६० हून अधिक रोपवे आणि केबल कार (Cable Bus) प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याच वेळी, सरकारला या प्रकल्पाशी संबंधित ३६० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यासोबतच, अमेरिका, युरोप आणि जपानसारख्या देशांकडून या प्रकल्पासाठी १३ तंत्रज्ञान प्रस्ताव देखील सरकारला प्राप्त झाले आहेत. देशातील पहिली केबल बस दिल्लीत सुरु होईल. सध्या त्यावर संशोधन कार्य सुरु आहे.
135 प्रवासी प्रवास करू शकतात- Cable Bus
केबल बस नेटवर्कमध्ये मर्यादित अंतरावर स्टेशन बांधले जातील, जिथून लोक त्यात चढू आणि उतरू शकतील. महत्वाची बाब अशी की हे संपूर्ण नेटवर्क पर्यावरण पूरक असणार आहे म्हणजेच इलेक्ट्रिक अर्थातच बॅटरीवर चालणारे राहणार आहे. एकदा या बसचे चार्जिंग संपले कि त्यानंतर फक्त ३० सेकंदात पुन्हा ती फुल्ल चार्ज होऊ शकते. या प्रस्तावित केबल बस मध्ये एकाच वेळी १३५ प्रवासी प्रवास करू शकतात. विशेष बाब म्हणजे या केबल बसेस मध्ये प्रवाशांना चहा पाण्याची सुद्धा सोय सुद्धा करून दिली जाणार आहे.




