पुणे | सुनिल शेवरे
लहान मुलांचे पाळणाघर असतात, डे केअर सेंटर असतात. तसेच वद्धांसाठीचे केअर सेंटर तुम्ही ऐकलत काय? होय अनिकेत पाटील आणि आेंकार अडकीने या दोन तरूणांनी ही वेगळी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. पुणं तिथं काय उणं या उक्तिप्रमाणे महाराष्ट्रातील पहिले आोल्डीज डे केअर सेंटर कॅफे ट्वीलाईट या नावाने पुण्यात कोथरूड भागात सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन आज अन्नपुर्णा परिवाराच्या संचालक मेधा पुरव सामंत यांच्या हस्ते झाले.
सुरूवातीला कॅफे सुरू करण्यामागची भूमिका अनिकेत पाटील याने मांडली. अशा उपक्रमाची गरज असल्याचे नमूद करून ही सामाजिक उद्योजकताच आहे असे मेधा पुरव सामंत म्हणाल्या.भारताची अर्थव्यवस्था मोठ्या उद्योगधंद्यांमुळे चालत नसून अशा सेवा क्षेत्रातील लघूउद्योगांमुळेच तरली आहे असेही त्यांनी सांगितले व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कॅफे ट्वीलाइट हे फक्त काॅफी पुरते मर्यादीत नसून त्यात कॅरम,चेस असे बैठे खेळ असणार आहेत. चित्रपट, छोटी नाटके,अभिवाचन असे उपक्रमही ईथे होणार आहेत. पुण्यासारख्या शहरात वद्धांना त्यांच्या मित्र मैत्राीणींना भेटण्याकरता तसेच खेळ खेळण्यातरिता यामुळे आता एक हक्काची जागा मिळाली आहे.
आजच्या या कार्यक्रमात शाम येणगे यांनी सत्यपालसिंग राजपूत यांच्या २ कवितांचं वाचन केले. आणि विजय तेंडूलकर लिखित अोळख या एकांकीचे सादरीकरण नाटकघर संस्थेने केले. कतार्थ शेवंगावकर आणि श्रुती मधुदीप हे एकांकीकेतील प्रमुख कलाकार होते.कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला. ही कल्पना आवडल्याचे सूर उपस्थितामध्ये आढळून आले.