सियाचीनमध्ये तैनात जवानांना कपडे, रेशनची कमतरता; कॅगच्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नुकताच कॅगने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीमेवर तैनात जवानांना दिल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सेवांच्या कमतरतेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालात उंचावरील युद्ध क्षेत्र म्हणजे सियाचीन, डोकलाम आणि लडाख या भागात तैनात असलेल्या जवानांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केलं आहे. येथील तैनात जवानांना हिवाळयासाठी आवश्यक असणारा विशेष पोषाख, स्नो गॉगल्स, बूट आणि अन्य साहित्याचा तुटवडा आहे. त्याशिवाय, जवानांना उष्ण कॅलरी युक्त पोषक आहार सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची माहिती कॅगच्या अहवालातून उघड झाली आहे.

दरम्यान, लष्करी जवानांना मिळणाऱ्या अपुऱ्या साहित्याबद्दल कॅगने संरक्षण मंत्रालयाच्या कार्यशालीवर प्रश्न उपस्थित केला आहे. अशा परिस्थितीत लष्कराच्या मुख्यालयामध्ये जे राखीव सामान असते, तिथे उंचावरील युद्ध क्षेत्रात तैनातीसाठी लागणारे कपडे आणि साहित्याची कमतरता आहे. निधीच्या मर्यादा असल्या तरी, लवकरच ही कमतरता भरुन काढू असे संरक्षण मंत्रालयाकडून कॅगला सांगण्यात आलं आहे.

“हा अहवाल वर्ष २०१५-१६ ते २०१७-१८ च्या कालावधीतील आहे मात्र, आता परिस्थितीमध्ये मोठया प्रमाणात सुधारणा झाली आहे. प्रत्यक्ष सियाचीनमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी हिवाळी पोषाख आणि साहित्याची कुठलीही कमतरता नाही आहे. सियाचीनमध्ये तैनात असणाऱ्या एका जवानाच्या पोषाखाचा खर्च एक लाख रुपये आहे. आपण हा पोषाख आयात करत असलो तरी, हा खर्च कमी व्हावा यासाठी स्वदेशी पोषाख निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

कॉमेडियन कुणाल कामराने राज ठाकरेंना ‘वडापावची’ लाच देऊ केली; जाणून घ्या काय आहे हे प्रकरण

जागतिक कर्करोग दिन२०२०: स्तन कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते

Leave a Comment