Calabash Farming | दुधी भोपळ्याची शेती करून फक्त 60 दिवसात कमवा लाखो रूपये, ‘या’ जातींची करा लागवड

Calabash Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Calabash Farming | नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. या उन्हाळ्यामध्ये शेतकरी वेगवेगळी उन्हाळी पिके घेत आहेत. यामध्ये भाजीपाला लागवडीसाठी हा काळ योग्य मानला जातो. या काळातच बागायतदार शेती हे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतात. उन्हाळ्यामध्ये शेतकरी हिरव्या भाज्यांची जास्त लागवड करतात. यामध्ये काकडी, टोमॅटो, पडवळ, दुधी भोपळा यांसारख्या भाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली जाते. दुधी भोपळा ही एक हंगामी भाजी आहे. दुधी भोपळ्याची (Calabash Farming) लागवड साधारणपणे उन्हाळ्यात होते. लागवड करण्यासाठी जास्त मेहनत देखील करावी लागत नाही. या भाजीच्या लागवडीसाठी तुम्हाला कमी खर्च करावा लागतो. आणि त्यातून तुम्हाला जास्त नफा मिळतो. आता याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन या विषयातील तज्ञ डॉक्टर विजयानंद यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कमी वेळ जास्त नफा मिळवायचा असेल, तर त्यांनी दुधी भोपळ्याची लागवड करा. पावसाळ्यापूर्वी जर तुम्ही दुधी भोपळ्याची लागवड केली तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. परंतु हे पीक पावसाळ्याआधीच काढणे खूप गरजेचे असते.

अशी करा शेती | Calabash Farming

दुधी भोपळ्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना सगळ्यात आधी नांगरणी करून शेतात थोडासा ओलावा ठेवून शेत तयार करावे लागेल. त्यानंतर त्याच्या बिया 24 तास ब्लू कॉपरमध्ये एक ग्राम प्रतिलिटर या पाण्यात भिजवून नंतर पेरल्या तर त्याचे उत्पन्न चांगले येते. या दुधी भोपळ्याला वेळेवर पाणी देत रहा. एक हेक्टरमध्ये अडीच ते तीन किलो बियाणे येतात.

कोणत्या प्रजाती उत्तम

उन्हाळ्याच्या हंगामात जर तुम्ही दुधी भोपळ्याची लागवड करून लाख रुपयांचा नफा कमवायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी काशी बहार, काशी कुंडल, नरेंद्र रश्मी आणि माधुरी यांपैकी कोणत्याही एका जातीची निवड करावी लागेल. त्यामुळे तुमचे उत्पन्न खूप चांगले येईल आणि चांगला आर्थिक नफा देखील मिळेल.