हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cameron Airpark) आजकाल प्रत्येकाकडे स्वतःची गाडी असते. मग ती दुचाकी असो किंवा मग चारचाकी. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून गर्दीत घुसमटण्यापेक्षा आपली गाडी बरी, असा यामागचा विचार. आता ट्रॅफिकमध्ये जीव घाईला येतो ही गोष्ट वेगळी. एकंदरच काय कि, ज्याच्या त्याच्या पार्किंगमध्ये एक तरी गाडी उभीचं असते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल या संपूर्ण जगात एक असं शहर आहे ज्याच्या पार्किंगमध्ये गाड्या नाही तर हँगरमध्ये विमानं पार्क केलेली दिसतात. आज आम्ही तुम्हाला या शहराविषयी माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊयात.
कुठे आहे हे शहर? (Cameron Airpark)
कॅलिफोर्नियात बाईक, स्कुटी आणि अगदी लग्जरी कारसुद्धा किरकोळ वाटतील असं हे शहर आहे. या शहराचं नाव ‘कॅमेरून एअर पार्क’ असे आहे. इथे तुम्हाला प्रत्येक घराबाहेर हँगरमध्ये (विमान ठेवण्याची जागा) स्वतःचं विमान पार्क केलेलं दिसेल. आता हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. (Cameron Airpark) तर मित्रांनो, या शहरात जितकी घरं आहेत त्या प्रत्येक घरात निवृत्त पायलट वास्तव्यास आहेत. त्यामुळे कुणाला साधा फेरफटका जरी मारायची इच्छा झाली तरी ते थेट स्वतःचं विमान बाहेर काढतात आणि मस्त फिरून येतात.
इतक्या घरांच्या मधून विमान कसं उडवतात?
कॅलिफोर्नियातील कॅमेरॉन एअर पार्क हे शहर अत्यंत खास आहे. कारण इथल्या प्रत्येक घरात निवृत्त पायलट राहतात. ज्यांना विमान उडवण्याचे योग्य ज्ञान आहे. त्यामुळे हे शहर सुद्धा अशाप्रकारे वसवलं आहे कि, इथे विमान उडवणे आणि लँड करणे सोपे जाईल.
(Cameron Airpark) १९६३ साली हे शहर उभारले गेले आणि या शहरात एकूण १२४ घरे आहेत. इथले रस्ते धावपट्टीसारखे रुंद रचले आहेत. ज्यामुळे विमानाच्या उड्डाणासाठी लागणारा प्लॅटफॉर्म म्हणून त्यांचा वापर होतो.
कॅमेरून एअरपार्कमध्ये रस्त्यावरील चिन्हे आणि लेटरबॉक्सेस सामान्य उंचीपेक्षा किंचित खाली बांधण्यात आली आहेत. जेणेकरून विमानाच्या पंखांना किंवा विमानाच्या इतर कोणत्याही भागाचे नुकसान होणार नाही.
तसेच इथल्या प्रत्येक घरामध्ये हँगरचे बांधकाम करण्यात आले आहे. हँगर म्हणजे अशी जागा जिथे विमान किंवा अवकाशयान ठेवले जाते. हि जागा यासाठी विशेष डिझाइन केलेली इमारत असते. यासाठी धातू, लाकूड किंवा काँक्रीटचा वापर केला जातो.
मध्यंतरी सोशल मीडियावर या शहरातील एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. जो अजूनही नेटकऱ्यांच्या चर्चेचा भाग आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर facttbyte या नावाच्या हॅण्डलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर अजूनही व्हायरल होत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (Cameron Airpark)