Cancer Information | आजकाल कॅन्सर हा अत्यंत वेगाने पसरणारा भयंकर रोग आहे. आपल्या देशात कॅन्सरचे अनेक रुग्ण देखील आढळलेले आहे. परंतु या कॅन्सलचे उपचार करणे सर्वसामान्य माणसांना अजिबात परवडत नव्हते. यासाठी 50 लाख रुपये खर्च करावे लागत होते. व्यक्तीला कॅन्सर आहे की नाही याचे निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत किमान 50 हजार रुपये किमतीच्या फ्लोरोसेंट फिल्टरच्या मदतीने चाचण्या करण्यात येत होत्या. परंतु आता यासाठी केवळ 10 रुपयांचा खर्च येणार आहे. यामुळे लाखो रुग्णांचा जीव देखील वाचणार आहेत.
या ग्रीन फ्लोरो सेंड फिल्टर पेशंटमध्ये विशिष्ट प्रथिने दाखवतात. या फिल्टरच्या मदतीनेच अनुवंशिक रोग, बॅक्टेरिया आणि विषाणू संक्रमणास कारणीभूत असणाऱ्या पेशीही शोधणे देखील आता अत्यंत सोपे झालेले आहे. (Cancer Information)
किती पैसे वाचणार ?
या नवीन चाचणीमुळे रुग्णांना होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत केवळ 10 ते 15 टक्के खर्च करावा लागणार आहे.
या संशोधनाला पेटंटही मिळालेले आहे. कॅन्सरच्या पेशी कोणत्या स्तरावर आहे? त्याची आत्ताची स्थिती काय आहे? आणि त्यापैकी शरीराच्या कोणत्या भागाकडे जात आहे? हे शोधणे आता टेक्नॉलॉजीमुळे शक्य झाले आहे.
किंमत कमी का? | Cancer Information
या फिल्टरची किंमत खूपच कमी आहे. यावेळी विभाग प्रमुख डॉक्टर रेखा खंडिया यांनी सांगितले की, बाजारातही हे फ्लोरो सेंड फिल्टर उपलब्ध आहे. ज्याची किंमत सुमारे 45 ते 50 हजार रुपये आहे हा नवीन फिल्टर फक्त 10 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे रुग्णांचा खूप मोठा खर्च वाचणार आहे.
वापर कुठे होणार ?
बीयूच्या बायो केमिस्ट्री आणि जेनेटिक विभागाने हे नवीन फिल्टर तयार केलेले आहे. डॉक्टर रेखा खंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे विद्यार्थी उत्संग कुमार आणि शैलेजा सिंगल यांनी हे संशोधन केलेले आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, यामध्ये विशिष्ट प्रथिनांची निर्मिती दाखवण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो.
परंतु सध्या बाजारात उपलब्ध असलेले फिल्टर कोर्टेज बनवलेले असून ते खूप महाग आहेत.