Cancer Symptoms | लोकांची जीवनशैली बदलल्याने आज काल अनेक आजार देखील बळावले आहेत. त्यातील कर्करोग हा एक अत्यंत मोठ्या प्रमाणात पसरणारा आजार आहे. आज-काल अगदी लहान मुलापासून ते वृद्ध लोकांपर्यंत अनेक प्रकारचे कर्करोग आपल्याला दिसून येतात. परंतु कर्करोग झाल्यावर आपण काहीच करू शकत नाही, असे अनेकांना वाटते. परंतु जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केला, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या तर कर्करोगाचा धोका हा आपल्याला कमी करता येतो. कर्करोगाचा धोका कमी करणे याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुम्ही वेळेतच कर्करोगाची लक्षणे (Cancer Symptoms) ओळखणे गरजेचे आहे. जेव्हा कर्करोगाच्या पेशी आपल्या शरीरात तयार व्हायला सुरुवात होतात. त्यावेळी आपल्या शरीर आपल्याला वेळोवेळी वेगवेगळे संकेत देत असतात. त्याकडे आपण चुकूनही दुर्लक्ष करता कामा नये. अशी लक्षणे कोणती आहेत? आणि त्यापासून बचाव कसा करायचा? याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसली? तर तुम्ही अजिबात दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
झपाट्याने वजन कमी होणे | Cancer Symptoms
वजन कमी होणे हे अत्यंत सामान्य लक्षण आहे. कर्करोगा व्यतिरिक्त इतर अनेक रोगांमध्ये देखील वजन कमी होते.परंतु जर एखाद्या व्यक्ती व्यवस्थित जेवण करत असेल. शारीरिक हालचाली देखील व्यवस्थित असेल तरीही त्याचे वजन झपाट्याने कमी होत असेल, तर ही एक चिंतेची बाब आहे. जर अशी लक्षणे दिसल्यास तुम्ही नियमित शारीरिक हालचाली करा. त्याचप्रमाणे तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.
सतत थकवा आणि अशक्तपणा येणे
आपण जेव्हा शारीरिक हालचाली करतो काम करतो. तेव्हा आपल्याला थकवा येतच असतो. परंतु जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय अगदी बसल्याबसल्या देखील थकवा आणि अशक्तपणा येत असेल, तर हे कर्करोगाचे एक लक्षण आहे. अशावेळी तुम्हाला पुरेशी झोप मिळत आहे का? याची काळजी घ्या. तसेच चांगला आहार घ्या आणि हायड्रेट रहा. तरीही थकवा जाणवत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.
वारंवार संक्रमण | Cancer Symptoms
जर एखादा व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल दुसऱ्या कुठल्याही आजाराचा संसर्ग होत असेल. तर त्याची रोगप्रतिकार शक्ती कमवत देखील असू शकते. आणि हे ल्युकेमिया म्हणजेच कर्करोगाची लक्षणे असू शकते. वारंवार येणारा ताप अस्पष्ट जखमा किंवा रक्तस्त्राव यांकडे दुर्लक्ष करू नका. तर अशी लक्षणे दिसत असेल तर तुम्ही स्वच्छता, सकस आहार आणि लसीकरण या गोष्टींकडे लक्ष द्या.
सूज आणि गुठळ्या
तुम्हाला जर मान, बगल पोट किंवा कमरेच्या अवतीभोवती कोणत्याही कारणाशिवाय सूत जाणवत असेल, तर ते देखील कर्करोगाचे लक्षण असू शकते. या गुठळ्या वेदना रहीत असतात परंतु त्या कालांतराने हळूहळू वाढत जातात. अशा पद्धतीने जर तुम्हाला लक्षणे दिसत असेल, तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.
सतत वेदना
तुमची हाडे किंवा सांधे सतत दुखत असेल, तर हा देखील एक कर्करोगाची सुरुवातीचे लक्षण आहे. जर तुम्हाला वारंवार अशा वेदना होत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. यासाठी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार चाचण्या करून घ्या.