Cancer Tablet | वैज्ञानिकांनी लावला कॅन्सरच्या टॅबलेटचा शोध, आता केवळ 100 रुपयात होणार इलाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cancer Tablet | आपल्या जगामध्ये कॅन्सर रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या आधी अमेरिका आणि चीनमध्ये सगळ्यात जास्त कॅन्सरचे रुग्ण होते. परंतु आता या दोन्ही देशांपेक्षा भारतामध्ये कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि यातील 10 कॅन्सर रुग्णांपैकी 5 जणांच्या मृत्यू होतो. परंतु ट्रीटमेंट नंतरही पेशंटची कोणत्याही प्रकारे गॅरंटी देता येत नाही.

अशातच कॅन्सरच्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटल टाटा हॉस्पिटलमधील डॉक्टरनी कॅन्सर या रोगाचा मोठा अभ्यास केला आहे. आणि त्यावर अशी एक टॅबलेट आणलेली आहे. ज्यामुळे कॅन्सर होण्यापासून आपण लांब राहतो. आपल्या देशातील कॅन्सरच्या रुग्णांची वाढती संख्या पाहून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च वैज्ञानिकांनी ही टॅबलेट (Cancer Tablet)विकसित केलेली आहे. जी कॅन्सरचा इलाज करणे आणि आणि दुसऱ्यांदा कॅन्सल होण्यापासून बचाव करते.

या पद्धतीने लागला शोध | Cancer Tablet

या शोधामध्ये उंदरामध्ये माणसांच्या कॅन्सरचे सेल टाकले होते. ज्या नंतर त्यांच्यामध्ये ट्यूमर निर्माण झाला. आणि त्यानंतर रेडिएशन थेरेपी, किमोथेरपी आणि सर्जरी यांसारखे इलाज केले गेले. त्यानंतर असे समजले की कॅन्सरचे सेल मरून जातात किंवा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये त्या होतात. या छोट्या छोट्या तुकड्यांना क्रोमोटीन कण असे देखील म्हणतात. परंतु हे क्रमोटन कण रक्तप्रवाह सोबत संपूर्ण शरीरामध्ये पसरू शकतात. आणि त्या हेल्दी सेल्समध्ये प्रवेश करतात आणि त्यांना कॅन्सर सेलमध्ये बदलतात. ज्यामुळे कॅन्सर नाहीसा झाला तरी पुन्हा एकदा होऊ शकतो. (Cancer Tablet)

क्रमोटीन कणवर ही टॅबलेट प्रभावी

या समस्याचे समाधान काढण्यासाठी डॉक्टरांनी उंदरांच्या कॉपर कम्बाईन प्रो एक्सीडेंट टॅबलेट दिली. ही टॅबलेट क्रोमोटीन कणचा प्रभाव रोखण्यासाठी मदतशील ठरली. गेल्या एक दशकापासून हे डॉक्टर या टॅबलेटवर काम करत होते. आणि शेवटी त्यांना यश मिळालेले आहे. अशातच फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑथोरिटी या टॅबलेटला मंजुरी देण्याची वाट पाहत आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर ही टॅबलेट बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कॅन्सर ट्रीटमेंटवर ही टॅबलेट (Cancer Tablet)खूप फायदेशीर असणार आहे.

100 रुपयात मिळणार टॅबलेट

टाटा मेमोरियल रुग्णालयाचे ज्येष्ठ कॅन्सर सर्जन डॉक्टर राजेंद्र बडवे यांनी सांगितले की, 100 रुपयांमध्ये ही आत्तापर्यंतचा सगळ्यात स्वस्त ट्रीटमेंट असणार आहे. त्यामध्ये थेरपीचे साईड इफेक्ट 50% कमी होण्याची शक्यता आहे. तसेच 30% परत कॅन्सर न होण्याचे आहेत. ही टॅबलेट केवळ 100 रुपयाला सगळीकडे उपलब्ध होईल. जून ते जुलैपर्यंत या टॅबलेटला मंजुरी मिळण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे.