हॅलो महाराष्ट्र | आजकाल कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. वेगवेगळे कॅन्सर आजकाल होत आहेत. कॅन्सर होताच शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. ज्यामुळे कॅन्सरची लक्षणे आपल्याला दिसतात. परंतु आता तुमच्या नखांच्या रंगांमध्ये त्याचप्रमाणे आकारावरून देखील तुम्हाला कॅन्सर आहे की, नाही हे ओळखता येऊ शकते. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ शास्त्रज्ञांनी याबाबतचे नवे संशोधन केले आहे. जर तुमच्या नखांच्या रंगांमध्ये पांढरे आणि लाल असा बदल होत असेल किंवा टोकावर फुगवता जाणवत असेल, तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण हा एक कॅन्सरचा धोका असण्याचे लक्षण आहे.
नखांच्या सामान्य स्थितीला ओनीकोपॅपिलोमा असे म्हणतात. ही नखे आकाराने मोठे असतात. नखाच्या रंगामुळे त्वचा, डोळे, किडनी यांचा कर्करोग होण्याची शक्यता आहे की नाही हे समजते. अमेरिकेने केलेल्या संशोधनात 88 लोकांच्या एकापेक्षा अनेक नखांमध्ये हा आजार आढळून आलेला आहे. 35 कुटुंबातील बीएपी सिंड्रोम असलेल्या 47 व्यक्तींचा यासाठी अभ्यास केला गेला.
अशावेळी काय करावे?
यावेळी तज्ञांनी सल्ला देता दिला आणि ते म्हणाले की, बीएपी 1 ट्यूमर प्रोडीस्पोझिशन सिंड्रोमचा निदानाचा त्वरित विचार केला पाहिजे. हा आजार सामान्य लोकांपेक्षा क्वचित लोकांमध्ये आढळतो. अशी लक्षणे दिसताच या आजारावर तातडीने उपचार केले पाहिजे.
यावेळी नेमके काय होते ?
प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ओनीकोपॅपीलोमा हा एक दुर्मिळ अनुवंशिक असा आजार आहे. याला बीएपी 1 ट्युमर प्रोडीस्पोझिशन सिंड्रोम असे म्हटले जाते. जणूकातील उत्परिवर्तन सिड्रोमच्या वाढीसाठी मदत करते. यामुळे कर्करोगाच्या गाठी होण्याचा धोका असतो.