फलटण तालुक्यातील 29 गावात कटेंटमेंट झोन : प्रातांधिकारी डाॅ. शिवाजी जगताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण तालुक्यामधील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित आणण्यासाठी 29 गावे ही प्रतिबंधक क्षेत्र म्हणजेच कटेंटमेंट झोन म्हणून सोमवारी दि. 9 ऑगस्ट रोजीच्या आदेशाद्वारे घोषित केलेले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी सांगितले.

फलटण तालुक्यातील तरडगाव, कुरोली बु.।।, विडणी, कोळकी (वनदेवशेरी, सावतामाळी नगर, चिंतामणी पार्क, त्रिमुर्ती अपार्टमेंट, व्यंकटेश अपार्टमेंट, चैतन्य अपार्टमेंट व शारदानगर), निंबळक, बरड, गिरवी, पाडेगाव, शिंदेमाळ, जाधववाडी, हिंगणगाव, साखरवाडी, राजुरी, पिंप्रद, कांबळेश्वर, दुधेबावी (काळेमळा चौंडी ते गावठाण दुधेबावी रोड), राजाळे, सुरवडी, वडले, मुंजवडी, आदर्की बु., वाखरी, सस्तेवाडी, चौधरवाडी, सरडे, खामगाव, फडतरवाडी, मठाचीवाडी व खडकी अशी 29 गावे ही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्या आदेशाने प्रतिबंधक क्षेत्र म्हणजेच कटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.

सदरील कटेंटमेंट झोनमध्ये केवळ आरोग्यविषयक सुविधा म्हणजेच दवाखाने व मेडिकल सेवा सुरू राहणार आहेत. इतर सर्व सुविधा (होम डिलिव्हरी सह) बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव करण्यासाठी सदर क्षेत्रामध्ये नियम न पाळणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे ही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment