‘या’ राज्यात हत्तींना मिळणार रेशन दुकानांवर मोफत अन्नधान्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तिरुअनंतपुरम । केरळमध्ये अन्नाच्या शोधात असलेल्या गर्भवती हत्तीणीने स्फोटकं भरलेलं अननस खाल्ल्यामुळे तिला आपला प्राण गमवावा लागला. यानंतर सोशल मीडियापासून संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणातून धडा घेत केरळ सरकारने आपल्या ताब्यात असलेल्या हत्तींसाठी रेशन दुकानांवर मोफत अन्नधान्य पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. “कोरोनामुळे सर्वांसाठीच खडतर परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांसोबत प्राण्यांनाही या परिस्थितीचा फटका बसला आहे. त्यामुळे आमच्या ताब्यात असलेल्या हत्तींची काळजी घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. त्यांचाही जीव वाचवणं महत्वाचं आहे.” अशी माहिती केरळचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पी. थिलोत्थमन यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना दिली.

या हत्तींसाठी केरळमधील रेशन दुकानांवर मोफत अन्नधान्य मिळणार आहे. यामध्ये तांदूळ (१२० किलो), गहू (१६० किलो), रागी (१२० किलो), गुळ (६ किलो) हळद-मीठ व इतर खाद्यपदार्थ हत्तींसाठी मोफत दिले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी केरळमधील हत्ती मालकांच्या संघटनेनी वन-विभागाकडे अन्नधान्याची सोय करण्याची मागणी केली होती. लॉकडाउन काळात हत्तीसाठी अन्नधान्याची सोय करणं आणि त्यांची काळजी घेणं या मालकांसाठी जिकरीचं होऊन बसलं होतं. यानंतर केरळ सरकारने पावलं उचलत हत्तींच्या मोफत अन्नधान्याची सोय केली आहे.

केरळमध्ये सध्या ४९४ हत्ती आहेत, ज्यातील बहुतांश हत्ती हे देवस्थांनाकडे तर काही हत्ती हे खासगी मालकांकडे आहे. या हत्तींची काळजी घेताना अनेकांना त्रासाचा सामना करावा लागला आहे. हत्तीची काळजी घेण्यासाठी एका दिवसाचा खर्च २ हजार रुपये आहे. यासाठी राज्य सरकारकडून ही मदत केली जात असल्याचं मंत्र्यांनी स्पष्ट केलं. पुढील ४० दिवसांसाठी प्रत्येक हत्तीच्या देखभालीसाठी १६ हजार रुपये आणि वन-विभागामार्फत हत्तींच्या जेवणाची सोय केरळ सरकारने केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment