Wednesday, October 5, 2022

Buy now

Innova गाडीची उभ्या ट्रकला पाठीमागून धडक; 5 जण ठार

सोलापूर | पुण्याहून हुबळीकडे निघालेल्या चारचाकी कारला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर भीषण अपघात झाला. बाजार समिती परिसरात थांबलेल्या ट्रकला चारचाकीची मागून धडक बसली. भरधाव वेगाने जाणारी गाडी चालकाला आवरलीच नाही. हा अपघात एवढा भीषण होता की चारचाकी अर्ध्यापर्यंत चक्काचूर झाली आहे. .

या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन बालक व दोन महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

सचिन आण्णासाहेब शितोळे (वय ३५), दिलीप जाधव (वय ३७), सोनाबाई जाधव (वय ५५), गौरी दिलीप जाधव ( वय ५) आणि लाडू दिलीप जाधव (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. तर रेखा दिलीप जाधव, विनायक बसवराज देवकर (वय २७) आणि वर्षा सचिन शितोळे या जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता की,सध्या क्रेनच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. मात्र,हे पाहण्यासाठी बघायची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याच चित्र दिसून येतंय.