नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटातून सावरत असलेली ऑटो इंडस्ट्री अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही. फेब्रुवारीमध्ये, कंपन्यांकडून डीलर्सकडे पाठवण्याचे प्रमाण वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने म्हटले आहे की,”सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यातील कमतरता, नवीन नियमांमुळे वाहनांच्या किंमतीत झालेली वाढ आणि इतर काही कारणांमुळे ऑटो मोबाईलच्या मागणीवर परिणाम होत आहे.”
SIAM डेटानुसार, देशांतर्गत प्रवासी वाहने, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची विक्री फेब्रुवारी 2021 मध्ये वार्षिक आधारावर 17,35,909 युनिट्सवरून 13,28,027 युनिट्सवर घसरली. एकूण प्रवासी वाहनांची डिलीवरी फेब्रुवारी 2022 मध्ये वर्षभरात 6 टक्क्यांनी घसरून 2,62,984 युनिट्सवर आली तर प्रवासी कारची घाऊक विक्री फेब्रुवारी 2021 मध्ये 1,55,128 युनिट्सवरून 1,33,572 युनिट्सवर घसरली. मात्र, युटिलिटी वाहनांच्या घाऊक विक्रीत वाढ झाली आहे आणि ती फेब्रुवारी 2021 मध्ये 1,14,350 युनिट्सवरून 1,20,122 युनिट्सपर्यंत वाढली आहे.
दुचाकी विक्री 27% कमी
SIAM डेटानुसार, फेब्रुवारीमध्ये व्हॅनची घाऊक विक्री फेब्रुवारी 2021 मध्ये 11,902 युनिट्सवरून 9,290 युनिट्सवर घसरली. त्याचप्रमाणे, एकूण दुचाकी विक्री वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत 27 टक्क्यांनी घसरून 10,37,994 युनिट्सवर आली आहे तर स्कूटरची घाऊक विक्री फेब्रुवारी 2021 मध्ये 4,65,097 वरून याच कालावधीत 3,44,137 युनिट्सवर घसरली आहे.
‘हे’ मुख्य कारण आहे
मोटारसायकलची घाऊक विक्री फेब्रुवारी 2021 मध्ये 9,10,323 युनिट्सवरून 6,58,009 युनिट्सवर आली आहे. त्याचप्रमाणे फेब्रुवारी 2022 मध्ये तीन चाकी वाहनांची विक्री फेब्रुवारी 2021 मधील 27,656 युनिट्सवरून 27,039 युनिट्सवर आली. SIAM चे महासंचालक राजेश मेनन सांगतात की,”सेमीकंडक्टरच्या पुरवठ्याशी संबंधित समस्या, नवीन नियमांमुळे किंमतीत झालेली वाढ, वस्तूंच्या वाढत्या किंमती, लॉजिस्टिकचा जास्त खर्च या कारणांमुळे ऑटो इंडस्ट्रीच्या एकूण विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.”