Car Loan Interest Rate | कार लोन घेताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा; जाणून घ्या बँकेचे व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Car Loan Interest Rate | प्रत्येक माणसाची आयुष्यात एक ड्रीम लिस्ट असते. आणि या ड्रीम लिस्टमध्ये स्वतःची कार असणे. हे एक खूप मोठे स्वप्न असते. घरच्यांसोबत बाहेर जाताना वेळ घालवण्यासाठी आपली कार असावी. त्याचप्रमाणे ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी कार खूप गरजेचे असते. परंतु कार घेणे सोपे नाही. पैशांचा विचार केला तर यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. आज काल अनेक बँका कार घेण्यासाठी कर्ज देत असतात. परंतु जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घेऊन कार घ्यायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.

जर तुम्ही देखील नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बँकेकडून कार लोन हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. या कारणांचा कालावधी तीन ते पाच वर्षाचा असतो. परंतु हे कर्ज घेताना तुम्ही हे कर्ज लवकरात लवकर कसे फिटेल याचा विचार करा. कर्ज घेताना ते जास्त कालावधीसाठी घेऊ नका. कारण यामुळे व्याजाची रक्कम वाढत जाते. आणि त्यानंतर तुमच्यावर आर्थिक भर येतो. आता कर्ज घेताना कोणत्या बँकेचा व्याजदर किती आहे आणि प्रोसेसिंग फी किती आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

बँकेचा व्याजदर आणि प्रोसेसिंग फी | Car Loan Interest Rate

युनियन बँक ऑफ इंडिया | Car Loan Interest Rate

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत कार लोक घेणार असाल तर या बँकेचा व्याजदर हा 8.70% ते 10.45% एवढा आहे. त्याचप्रमाणे या बँकेची प्रोसेसिंग फि 1000 हजार रुपये एवढी आहे.

पंजाब नॅशनल बँक

कार लोन घेताना पंजाब नॅशनल बँकेचा व्याजदर हा 8.75 टक्के ते 10.6% एवढा आहे. तसेच या बँकेसाठी प्रोसेसिंग 1000 ते 15000 रुपये लागते.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा अंतर्गत जर तुम्हाला कार लोन घ्यायचे असेल, तर या बँकेचा व्यासदर 8.95% ते 12.70% एवढा आहे. तसेच 2 हजार रुपये ही या बँकेची प्रोसेसिंग फी आहे.

कॅनरा बँक

तुम्ही जर कॅनरा बँके अंतर्गत कार लोन घेत असाल तर या बँकेचा व्याजदर हा 8.70% ते 12.70% एवढा आहे. परंतु या बँकेला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी नाही.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया अंतर्गत जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर या बँकेसाठी तुम्हाला व्याजदर 85% ते 12.10% एवढे व्याजदर लागते. तसेच 1000 ते 5000 रुपये प्रोसेसिंग फी आहे.

एसबीआय बँक

एसबीआय बँक अंतर्गत जर तुम्ही कार लोन घेतले. तर यासाठी तुम्हाला 9.5% ते 10.10% एवढे व्याजदर मिळेल. तसेच या बँकेला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी नाही.

कार खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्या | Car Loan Interest Rate

तुम्ही जर वरील बँकांमधून कर्ज घेतले तर त्याचा व्याजदर जास्त आहे. परंतु प्रोसेसिंग फी अगदीच कमी आहे. त्यामुळे तुमच्या खिशावर जास्त ताण येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती आणि कार घेणे खरच गरजेचे आहे का? त्यानंतर तुमच्या इतर जीवनावर काय परिणाम करेल? या सगळ्याचा विचार करून कार खरेदी करा. कारण घेताना कर्जाचा कालावधी कमी ठेवा. नाहीतर तुम्हाला जास्त व्याजदर द्यावे लागेल.