हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Car Loan Rule) हक्काचं घर आणि स्वतःची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुठे लॉन्ग ड्राइव्ह किंवा बाहेरगावी जायचे असेल तर मित्राची किंवा नातेवाईकांची गाडी मागावी लागते. नाहीतर मग ट्रॅव्हल टॅक्सीने खर्च करून जावं लागत. अशावेळी एकतर दुसऱ्याची गाडी वापरण्याची जबाबदारी अंगावर येते आणि दुसरं म्हणजे ट्रॅव्हल टॅक्सीमूळे अमाप खर्च होतो. मग वाटत की आपलीच गाडी असती तर बरं झालं असतं. त्यामुळे गेल्या काही काळात कार खरेदीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसले. अशातच जर तुम्हीही गाडी खरेदी करायचा विचार करत असाल आणि त्यासाठी लोन घेणार असाल तर ही बातमी नीट काळजीपूर्वक वाचा.
आजकाल अनेक बँका अगदी सहज आणि सुलभ पद्धतीने कार लोन (Car Loan Rule) देताना दिसत आहेत. ज्यामुळे काही प्रमाणात आगाऊ रक्कम भरून कोणतीही कार लोनवर घेता येते. साहजिक आहे की, आपला पगार आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कार खरेदी केली जाते. आवाक्याबाहेरची गाडी कितीही आवडत असली तरी लोन ही जबाबदारी असते हे विसरून चालणार नाही. अशावेळी कोणत्या किंमतीची कार किती पगारावर घेणे योग्य आहे? याबाबत कन्फ्युजन होत असेल तर त्यासाठी तुम्हाला कार लोनबाबतचा 20/4/10 हा नियम माहित असणे गरजेचे आहे. काय सांगता? तुम्हाला हा नियम माहित नाही? मग आत्ता लगेच जाणून घ्या.
काय आहे नियम 20/4/10? (Car Loan Rule)
जर तुम्ही कार घेण्याचा विचार करताय आणि त्यासाठी तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर सर्वात आधी कार लोन घेताना उपयोगी पडणाऱ्या 20/4/10 या नियमांबाबत पूर्ण माहिती जरूर घ्या. कारण हा नियम माहित असेल तर कार लोन घेतेवेळी खूप फायदा होतो. या नियमांतर्गत तुम्हाला किती रक्कम आणि कोणत्या कालावधीसाठी कार लोन घ्यावे लागेल? याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. यामध्ये ग्राहकाच्या आर्थिक स्थितीनुसारमाहिती प्रदान केली जाते. त्यामुळे लोन घेतल्यानंतर पश्चाताप करावा लागत नाही.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही कार खरेदी करणार असाल तर त्याआधी 20/4/10 या नियमानुसार काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
1. जर तुम्ही कारसाठी कर्ज घेताय तर 20/4/10 च्या नियमानुसार कार खरेदी करताना तुम्हाला किंमतीच्या २०% डाउनपेमेंट करावे लागेल.
2. कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी कमाल ४ वर्षांचा कालावधी निवडा.
3. तसेच EMI रक्कम तुमच्या मासिक पगाराच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू नका.
या काही महत्वाच्या गोष्टींचे आवर्जून पालन करा. (Car Loan Rule) तसेच
4. अपग्रेड केलेले मॉडेल घेण्याऐवजी कारचे बेस मॉडेल खरेदी करा. ज्यामुळे तुम्हाला गाडी स्वस्तात पडेल.
5. गतवर्षीच्या उरलेल्या नव्या कार इन्व्हेंटरीचा विचार करा आणि नव्या कारसाठी बचत करा.
6. नवीन कार घेण्याइतके बजेट नसल्यास तुम्ही वापरलेली कार खरेदी करण्याचा विचार करा. या गोष्टीदेखील बारकाईने विचारात घ्याव्या.