Swift कारला धडकून लक्झरी पलटी झाली अन् थेट हॉटेलमध्ये घुसली; थरकाप उडवणारा Video पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूर येथे स्विफ्ट व लक्झरीचा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातात लक्झरी पलटी होऊन वाहनांना धडक देत थेट हॉटेल मध्ये घुसली आहे. या अपघातात स्विफ्ट चालकाचा मृत्यू झालं आहे तर लक्झरी मधील पंचवीस प्रवाशी जण जखमी झाले आहेत.

मध्यरात्री 2 वाजता हा भीषण अपघात झाला. लक्झरी बस ही पुण्याकडून नगरच्या दिशेने जात होती. त्यावेळी स्विफ्ट कार सोबत अपघात होऊन लक्झरी महामार्गावरून थेट पलटी होऊन हॉटेल मध्ये घुसली. या अपघाताची भयावह दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.

अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या अंगावर नक्कीच काटा येईल. दरम्यान, या भीषण अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला असून लक्झरी मधील पंचवीस प्रवाशी जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.