हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत 14.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ती वाढून 2,15,916 यूनिट्स झाली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1,89,129 यूनिट्स इतकी होती. ऑटो इंडस्ट्रीची संस्था ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (SIAM-Society of Indian Automobile Manufacturers Passenger) यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.
ऑगस्टमध्ये दुचाकींची विक्री 3 टक्क्यांनी वाढून 1.56 दशलक्ष यूनिट्स झाली असल्याचे सियामच्या आकडेवारीवरून दिसून आले. गेल्या महिन्यात दुचाकींची विक्री 15,59,665 यूनिट्स इतकी झाली आहे. तर मागील वर्षी याच महिन्यात ती 15,14,196 यूनिट्स इतकी होती. ऑगस्ट 2019 मध्ये मोटारसायकलची विक्री 9,37,486 मोटारींच्या तुलनेत 10,32,476 यूनिट्स होती जी 10.13 टक्के जास्त आहे.
मागील वर्षी याच महिन्यात 5,20,898 स्कूटरची विक्री झाली होती, जी यावर्षी ऑगस्टमध्ये 4,56,848 यूनिट्स आहेत. म्हणजे ते 12.3 टक्क्यांनी घसरले आहे.
मारुती सुझुकी इंडियाचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची आयुकावा यांनी शुक्रवारी सांगितले की, भारतीय वाहन उद्योग इतिहासातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. जीएसटी कपात आणि प्रोत्साहन आधारित स्क्रॅपेज धोरणाच्या स्वरूपात सरकारच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.
ऑटो उद्योग संस्था सियामचे अध्यक्ष असलेले अयुकावा म्हणाले की, ‘कोरोना विषाणूचा साथीचा रोग आणि गेल्या आर्थिक वर्षापासून सुरू असलेल्या सुस्तपणामुळे हे क्षेत्र कित्येक वर्ष मागे गेले आहे.’ ते म्हणाले की, ‘जागतिक आरोग्य संकटाचा सामना करताना, भारतीय वाहन उद्योगाने व्हेंटिलेटर, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (PPE) तयार करण्यासाठी तसेच परदेशातून टेस्ट किट आयात करून विषाणूचा सामना करण्यासाठी आपली भूमिका बजावली.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”