लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९ जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोटा पाण्याची गोष्ट|संरक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त घेण्यात येणारी प्रवेश पूर्व परीक्षा (संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०१९) दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II)-२०१९
भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला मध्ये ४५ जागा, हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ जागा, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई मध्ये २२५ जागा आणि ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई मध्ये १५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९६ ते १ जुलै २००१ किंवा २ जुलै १९९५ ते १ जुलै २००१ दरम्यान झालेला असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता २००/- रुपये आणि (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – दिनांक ८ सप्टेंबर २०१९ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ जुलै २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

https://upsconline.nic.in/mainmenu2.php