Career Tips After 10th And 12th ।10वी आणि 12वी…. आपल्या आयुष्याच्या आणि करिअरचा महत्वाचा टप्पा….. करिअर मध्ये मोठं काहीतरी करायच असेल तर तुम्हाला 10वी आणि 12वीला चांगले मार्क असायला हवेत… तरच पुढच्या ऍडमिशन साठी तुम्हाला सोप्प पडत… परंतु कधी कधी चांगले गुण मिळवूनही काही तरूण आपल्यासाठी काय योग्य याची माहिती न घेता दुसऱ्याच क्षेत्रात जातात आणि स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात. कधी कधी तर करिअरचे पर्याय इतके जास्त असतात कि नेमकं कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं यातच अनेक जण गोंधळून जातात… तुम्हीही अशा प्रकारचे कन्फ्युज असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अशा ५ टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुम्हाला योग्य अशा क्षेत्रात करिअर करू शकता… या टिप्स आपण सविस्तर जाणून घेऊयात….
1) स्वतःला ओळखा- Career Tips After 10th And 12th
पहिली गोष्ट म्हणजे आधी स्वतःला ओळखा…. तुम्ही काय करू शकता? तुमचे प्लस पॉईंट काय आहेत? तुमच्यात काय कौश्यल्य आहेत आणि तुमच्या मर्यादा काय आहेत हे तुम्हालाच माहिती असते.. तुम्हाला गणित आणि विज्ञान आवडत असेल तर इंजिनीअरिंग, मेडिकल किंवा संशोधन क्षेत्र योग्य ठरू शकते. जर तुम्हाला कला, लेखन किंवा सर्जनशील काम आवडत असेल तर ग्राफिक डिझायनिंग, जर्नालिझम किंवा फॅशन डिझायनिंग यांचा विचार तुम्ही करू शकता.. जर तुम्ही संवाद साधण्यात चांगले असाल तर मार्केटिंग किंवा पब्लिक रिलेशन्स निवडू शकता. जर तुम्हाला समाजसेवा करायची असेल तर सोशल वर्क किंवा एनजीओ क्षेत्र निवडता येईल
२) करिअरमध्ये कोणकोणते ऑप्शन आहेत ते पहा –
आजच्या काळात करिअर क्षेत्रात भरमसाठ पर्याय (Career Tips After 10th And 12th) आहेत. तुम्ही विज्ञान शाखेतून १२ वी पास झाला असाल तर इंजिनीअरिंग करू शकता, , मेडिकल (MBBS, BDS, फार्मसी), बायोटेक्नॉलॉजी, डेटा सायन्स यामध्ये करिअर करू शकता. वाणिज्य शाखेतून १२ वी पास झाला असाल तर चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), कंपनी सेक्रेटरी (CS), फायनान्स, मार्केटिंग करू शकता. कला शाखेतून १२ वी पास झाला असाल तर फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग,पत्रकारिता, साहित्य, या क्षेत्रात करिअर करू शकता.
३) करिअरचे प्लॅनिंग–
कोणत्याही क्षेत्राची निवड करताना त्या क्षेत्राबद्दल आधी संपूर्ण माहिती घ्या. आणि मगच करिअर निवडा. कोणत्या क्षेत्रात नोकरी करायची आहे त्यासाठी शिक्षण, त्याचे क्लास, बेस्ट कॉलेज, त्याचा खर्च याचा विचार करून त्यानूसार वाटचाल करा. तुमची आर्थिक परिस्थिती ते करिअर करण्यासाठी अनुकूल आहे का याचाही अंदाज घ्या… तुम्हाला ते करिअर झेपेल का हे आधी स्वतःला विचारा…. मगच पुढच पाऊल टाका.
४) ट्रेंड्सचा विचार करा–
कोणत्या क्षेत्रात करिअर केल्यास (Career Tips After 10th And 12th) भविष्यात फायदा होऊ शकतो ते आधी सर्च करा… त्यासाठी सध्याचे ट्रेंडिंग क्षेत्र कोणकोणती आहेत याचा अभ्यास करा. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, कंटेंट क्रिएशन, यूट्यूब, पॉडकास्टिंग, रिन्यूएबल एनर्जी, या क्षेत्रांचा बोलबाला सुरु आहे.. त्यानुसार तुम्हाला यापैकी कोणत्या क्षेत्रात रस आहे ते पहा आणि त्यानुसार पुढचं नियोजन तुम्ही करू शकता.
५) तज्ज्ञांशी बोला-
कोणताही निर्णय घाईगडबडीत घेण्यापेक्षा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. तुमचे प्लस पॉईंट आणि तुमच्या मर्यादा तुमच्या शिक्षकांना आणि आईवडिलांना चांगल्या माहित असतात. तुम्ही किती हुशार आहात? तुम्हाला काय जमत ते तुमच्या शिक्षकाना अचूक माहिती असते… त्यामुळे तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता… त्यानंतर पालकांचा सल्ला घ्या, कारण तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ते मार्गदर्शन करू शकतात. त्यानंतर तुम्ही ज्या क्षेत्रात पाऊल टाकणार आहात त्या क्षेत्रातील 2-3 व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी 15-20 मिनिटे चर्चा करा.