सावधान! आपले Aadhaar card असू शकते बनावट, आता घरबसल्या तपासू शकता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्वाचे दस्तऐवज बनले आहे. सिमकार्ड खरेदी करण्यापासून ते सरकारी आणि खासगी क्षेत्रापर्यंत सर्व ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे. आपल्याला आपल्या घराचे काम करायचे असेल की बँकिंगचे काम, सर्वत्र आधार कार्ड आवश्यकच आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे असलेले आधार कार्ड बनावट असेल आणि याची आपल्याला माहिती नसेल तर अडचणी वाढू शकतात. तर मग आपला आधार नंबर बनावट आहे की नाही हे जाणून घेणे आपल्या प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. आपण आपले आधार बनावट आहे कि नाही ते कशा प्रकारे ओळखू शकता हे जाणून घेउयात…

आधारशी संबंधित ऑनलाइन माहितीसाठी आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करणे फार महत्वाचे आहे. आपण आपला ईमेल ऍड्रेस आणि मोबाइल नंबर व्हेरिफाय करू शकता जो रजिस्ट्रेशनच्या वेळी किंवा नवीन आधार तपशिलाच्या अपडेटवेळी घोषित केला गेला असेल. आधार ऑनलाइन सेवा मिळविण्यासाठी संबंधिताचा मोबाईल नंबर रजिस्टर असावा. जर तुम्हाला आधारशी संबंधित तक्रार नोंदवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करावा लागेल.

आधार कार्ड खरे किंवा बनावट हे अशाप्रकारे तपासा
सर्व प्रथम, आपण आधार https://resident.uidai.gov.in/aadhaarverifications च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
येथे आपल्या समोर आधार व्हेरिफिकेशन पेज उघडलेले असेल, त्यानंतर आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स दिसेल जिथे आपल्याला आपला आधार क्रमांक भरावा लागेल.
त्यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक भरा. नंतर डिस्प्लेमध्ये दर्शविलेले कॅप्चा भरा.
आता व्हेरिफाय बटणावर क्लिक करा. जर तुमचा आधार क्रमांक बरोबर असेल तर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला एक मेसेज मिळेल ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक देण्यात येईल.
यासह, आपली संपूर्ण माहिती खाली असेल. त्याच बरोबर जर हा नंबर बनावट असेल तर इनव्हॅलिड आधार नंबर लिहिला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment