कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पडताळणीचे काम काळजीपूर्वक करा

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या सूचना

औरंगाबाद | जिल्हयातील सर्व मतदारसंघांतील मतदार यादी पडताळणी प्रक्रिया अचूक व गुणवत्ता पूर्वक राबविण्याच्या सूचना राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, आप्पासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी (कन्नड) जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी (पैठण, फुलंब्री) स्वप्नील मोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर, सिद्धार्थ धनजकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मतदार माहितीची नोंदणी प्रक्रिया ही वेळोवेळी अद्यावत करणे आवश्यक आहे. मतदार ओळखपत्रावरील मतदारांची नावे, वय, लिंग, फोटो इ. मध्ये विसंगती दूर करणे. तसेच दुहेरी मतदार नोंदणी शोधून ते अद्यावत करणे, मृत्यूपावलेल्या मतदारांची नावे मतदान यादीतून वगळणे.  इतर संबंधित कामे करताना मतदान नोंदणी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन यादी निदोष करण्यास प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर सध्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या काळात योग्य खबरदारी घेत व काळजीपुर्वक काम करावे. तसेच मतदार नोंदणी संदर्भात विविध प्रकारचे अर्ज व त्यांचा उपयोग आणि निवडणूक विषयक कामे करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने सविस्तर मार्गदर्शन देशपांडे यांनी केले.

यावेळी देशपांडे यांनी मतदान नोंदणी अधिकारी व कर्मचारी यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. डॉ. भारत कदम यांनी यावेळी जिल्ह्यातील मतदार संघानिहाय मतदार नोंदणी छायाचित्र नसलेल्या मतदारांबाबतची कार्यवाही आदींसह निवडणूक विमागामार्फत करण्यात येत असलेल्या बाबींची माहिती दिली.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou

You might also like