हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवार (आज) सकाळपासून ट्विटरवर #CarryMinati हा हॅशटॅग एकदम जोरदार ट्रेंड करतोय. यावरच्या मीम्सला तर बिन बारिश पूर आला आहे. युट्यूबर कॅरी मिनाटी अर्थात अजय नागरने एक नवा रोस्ट व्हिडीओ अपलोड केला आणि हा सोशल मीडियावर धुमाकूळ सुरु झाला. सुमारे ४ महिन्याच्या मोठ्या विश्रांतीनंतर कॅरी मिनाटीने हा रोस्ट व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत कॅरीने नेहमीप्रमाणे त्याच्या हटके आणि आगळ्या वेगळ्या अंदाजात अनेकांची खिल्ली उडवली आहे. पण सर्वाधिक रोस्ट झाली आहे ती बिग बॉस १४ची स्पर्धक आणि विजेती रूबीना दिलैक. याशिवाय जान कुमार सानू याचीही त्याने जबरदस्त टर खेचली आहे. हा व्हिडीओ २१ मिनिटांचा असून सध्या तुफान व्हायरल होतोय.
https://www.instagram.com/p/CPOJ6-bn64d/?utm_source=ig_web_copy_link
‘द लँड ऑफ बिग बॉस’ नावाने अपलोड करण्यात आलेल्या या रोस्ट व्हिडीओत बिग बॉस १४ च्या घरातील वाद आणि अनेक मजेदार सीन्स आपल्याला पाहायला मिळतील. राखी सावंत, एजाज खान, जान कुमार सानू आणि विजेती रूबीना दिलैक या व्हिडिओत दिसतेय. सलमान खान ‘बिग बॉस १४’ ची विजेती म्हणून रूबीनाचे नाव जाहिर करतो, त्यावेळी तिच्या चेह-यावरच्या हावभावांची एक क्लिप या व्हिडीओत आहे. यावर मुबारक, आता कक्कड फॅमिलीकडून फोन येईल, असे म्हणत कॅरी तिची खिल्ली उडवताना दिसतोय.
https://www.instagram.com/p/CMjLtyFJch6/?utm_source=ig_web_copy_link
मुख्य म्हणजे ‘बिग बॉस १४’ जिंकल्यानंतर रूबीनाचा नेहा कक्करसोबत ‘मरजानेया’ हा म्युझिक व्हिडीओ आला होता. या पार्श्वभूमीवर कॅरीने रूबीनाला रोस्ट केले आहे. या व्हिडीओत कॅरीने राहुल वैद्यलाही रोस्ट केले आहे. नेहमीप्रमाणे या व्हिडीओत कॅरीने शिव्या आणि असभ्य शब्दांचा पुरेपूर वापर केला आहे. त्यामुळे बातमीसोबत त्याचा हा रोस्ट व्हिडीओ आम्ही जोडलेला नाही. पण युट्युबला विचाराल तर लगेच हा व्हिडीओ तुम्हाला सापडेल.
https://www.instagram.com/p/CK8lhXMBcTY/?utm_source=ig_web_copy_link
नव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव चांगलेच ओळखीचे आहे. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर असून कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादच्या अजयचे युट्यूबवर CarryMinati व CarryIsLive अशी दोन युट्युब चॅनल्स आहेत. युट्यूब करिअरसाठी कॅरीने १२ वीची परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला होता. पण पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले.
https://www.instagram.com/p/CIa7n_YhPZV/?utm_source=ig_web_copy_link
युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी कॅरी ओळखला जातो. वयाच्या १०व्या वर्षापासून कॅरीने युट्यूबवर व्हिडीओ पोस्टिंगला सुरुवात केली. अगदी सुरुवातीला सनी देओलची मिमिक्री करणारा व्हिडीओदेखील त्याने पोस्ट केला होता. २०१४ साली त्याने कॅरी मिनाटी हे युट्यूब चॅनल सुरु केले. पुढे २०१७ मध्ये CarryIsLive हे आणखी एक युट्यूब चॅनल त्याने सुरु केले आणि आज तो अत्याधिक लोकप्रिय युट्युब स्टार झाला आहे.