नाशिकमध्ये भीषण अपघात ! भरधाव कारची तीन वाहनांना धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक भीषण अपघात (accident) घडला आहे. यामध्ये एका भरधाव कारने तीन वाहनांना धडक दिली आहे. नाशिकच्या उंटवाडी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला आहे. यामध्ये एका अपघातग्रस्त कारमध्ये पैशांची बॅग आढळून आल्याने पोलीसदेखील हैराण झाले आहेत. तीन वाहनांना धडक देणाऱ्या अपघातग्रस्त (accident) वाहनात कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर ही अपघातग्रस्त कार अंबड पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली. दरम्यान तपासणीदरम्यान या कारच्या मागील सीटवर बॅगमध्ये ही रक्कम दिसली. यात 500 आणि 2 हजार रूपयांच्या आढळून आल्या. ही रक्कम नेमकी किती आहे, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, अपघातग्रस्त (accident) कारमध्ये इतकी मोठी रक्कम सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

ही रोकड कुठून आली? ती कुणाची आहे ? या सगळ्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.दरम्यान अपघात (accident) झाला त्यावेळी या गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी