हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे म्हणजे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. त्यामुळे तिथे शिकणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्याही तेवढीच अधिक आहे. पुणेकरांसाठी शहराअंतर्गत प्रवासासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ सर्वोत्तम साधन असून त्यातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. काही दिवसांपूर्वी पुण्यात डिजिटल इ तिकीट सुविधा सुरु करण्यात आली होती. आता तर PMP चा पासही कॅशलेस स्वरूपाचा असणार आहे, तशी सुविधा सुरु झाली असून या पाससाठी QR कोडच्या माध्यमातून पेमेंट करावं लागेल.
महिन्याला 60 हजार पास होतात विक्री
पुण्यात महिन्याला 60 हजार मासिक पास तसेच अन्य पासची विक्री होते. आजकाल तरुणाई मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर करते हे लक्षात घेऊन महामंडळाने ई – तिकीट ची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळ पाससाठी करावे लागणारे पेमेंटदेखील ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. ऑनलाईन पेमेंटसाठी आवश्यक सुविधा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पास केंद्रात उपलब्ध असणार आहे.
QR कोडद्वारे पासचे पैसे देण्यास सुरुवात
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांच्या ठरावानुसार आजपासून (23 ऑक्टोबर ) महामंडळ सर्व 40 पास केंद्रांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना QR कोडद्वारे पासचे पैसे देण्यास सुरुवात करणार आहे. कॅशलेस पास सुविधेचे उद्घाटन पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते आणि परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व प्रशासकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत होणार आहे.