‘मतदान करा आणि मिळवा मिसळवर १० % डिस्काउंट’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । ”खणखणीत मत देऊन आलोय.. झणझणीत मिसळ खायला” हे घोषवाक्य आहे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लक्ष्मी मिसळ यांचं. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी चक्क मतदान करून आल्यानंतर मिसळ वरती १०% डिस्काउंट दिला या ‘लक्ष्मी मिसळ’ यांनी दिला आहे. यावेळी ‘मतदान केलेलं बोट दाखवा आणि १०% डिस्काउंट मिळवा’ अशी खास ऑफर त्यांनी मतदारांना ठेवली आहे.

कोल्हापूर हे झणझणीत मिसळ साठी जगात प्रसिद्ध आहे. राज्यातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु कोल्हापुरात देखील हा टक्का वाढला पाहिजे यासाठी प्रशासनाबरोबरच कोल्हापूरच्या प्रसिद्ध असणाऱ्या उद्यमनगर मधील लक्ष्मी मिसळ ने पुढाकार घेतला आहे. ‘डिस्काउंट ची ऑफर ठेवून खवय्या असणाऱ्या मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज सकाळपासूनच कोल्हापूरकरांनी मिसळ खाण्यासाठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे यावेळी ”मतदान करून मिसळ खाल्यानंतर सेल्फी काढण्यासाठी ‘सेल्फी पॉईंट’ची देखील त्यांनी सोय” केली आहे.

Leave a Comment