‘बुलेट चं उत्तर बॅलेट ने देऊया!’ – जिल्हाधिकारी गडचिरोली

गडचिरोली प्रतिनिधी । सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. सर्वत्र मतदान सुरळीत आणि अडचणी शिवाय पार पडावे यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर पोलीस सुरक्षा तैनात करण्यात अली आहे. राजकीय मंडळींबरोरच प्रशासकीय अधिकारी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून सर्वांना परिचित असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आपली प्रतिक्रिया देतांना शेखर सिंह म्हणाले कि, ‘जर आपल्याला गडचिरोली जिल्हा नक्षल मुक्त करायचा असेल तर मतदान करणे गरजेचे आहे.’ त्यामुळे नक्षल्यांच्या “बुलेट चे उत्तर बॅलेट ने देऊया ! चला मतदान करूया!” असे आवाहन सिंह यांनी केलं आहे.

You might also like