सीसीटीव्हीत कैद : व्हॅगनार कार स्नॅक्स सेंटरमध्ये घुसली

Wagner car Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा- रहिमतपूर मार्गावर एका गाडी चालकाचा ताबा सुटल्याने व्हॅगनार कार (Wagner Car) स्नॅक्स सेंटरमध्ये घुसल्याची घटना घडली. यामध्ये गाडी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. सदरील सर्व प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातकडून रहिमतपूरकडे जाणाऱ्या  मार्गावर हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्नॅक्स सेंटरमध्ये व्हॅगनार कार (MH-43-N-9113) घुसली आहे. कोरेगाव तालुक्यातील धामणेर गावानजीक हा सर्व प्रकार घडला असून तो सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

धामणेर येथील रानमळा स्नॅक्स सेंटरमध्ये गाडी गेली असून गाडीसह स्नॅक्स सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. स्थानिकांनी या अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढले. तसेच उपचारासाठी पुढे हलविले आहे.