सावधान!! बुस्टर डोसच्या नावाखाली मागितला जात आहे ओटीपी; बँक खाते होईल रिकामे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात सायबर गुन्हेगारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फसवणुकीचे बळी पाडत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आता या सायबर गुंडांनी कोरोनाच्या बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक सुरू केली आहे. बुस्टर डोस मिळवण्याच्या नावाखाली या गुंडांनी लोकांना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली आहे. बूस्टर डोससाठी रजिस्ट्रेशन करण्याच्या नावाखाली ते लोकांना कॉल करतात आणि OTP नंबर विचारतात आणि त्याद्वारे ते त्यांची बँक खाती रिकामी करतात.

अशा प्रकारे होते फसवणूक
ही फसवणूक करणारी लोकं तुम्हाला कॉल करतील आणि विचारतील कि, तुम्हांला लसीचे दोन्ही मिळाले आहेत का?. तुम्ही हो म्हणल्यास ते तुम्हांला बूस्टर डोस घ्यावा लागेल असे सांगतील आणि त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याविषयी सांगतील. त्यानंतर आलेला OTP सांगण्यास सांगतील. तुम्ही OTP सांगताच तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.

दरम्यान , देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रॉनची 552 नवीन प्रकरणे आल्यानंतर, देशातील ओमिक्रॉन संक्रमित लोकांची संख्या 3,623 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी ही माहिती दिली. गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,59,632 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. तर 24 तासात देशात 327 लोकांचा मृत्यू झाला आहे

Leave a Comment