CBI Apprentice Recruitment 2024 | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, तब्बल 3000 रिक्त पदांसाठी होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

CBI Apprentice Recruitment 2024 | शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. बँके तील नोकरी त्यांना अत्यंत सुरक्षित वाटते. आता अशाच बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नवीन संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिससाठी तब्बल 3000 पदांसाठी भरती काढण्यात आलेली आहे.

यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू करत आहे. तुम्हाला जर या बँकेमध्ये करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात आजकाल अनेक तरुण आहेत जे नोकरीच्या शोधत आहेत.त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. यासाठी तुम्ही नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीम यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कोण अर्ज करू शकतो

या बँकेत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालयातील किंवा संस्थेतून पदवीधर असणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या तारखा | CBI Apprentice Recruitment 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 21 फेब्रुवारी 2024 पासून ही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे 6 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

वयोमर्यादा

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा 11 एप्रिल 1996 च्या आधी आणि 31 मार्च 2004 नंतर झालेला असावा. तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क

हा अर्ज करताना तुम्हाला ठराविक रक्कम भरावी लागेल. जनरल आणि ओबीसी कॅटेगिरीसाठी या अर्जाची फी 800 रुपये एवढी आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी या वर्गासाठी 600 रुपये आहे.

निवड प्रक्रिया

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीसाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर तिथे एक तुमची परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने द्यावी लागेल. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार नोकरीसाठी पात्र असतील.

मासिक वेतन

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जर उमेदवाराची निवड झाली तर त्याला मासिक 15 हजार रुपये एवढा पगार मिळेल. त्याचप्रमाणे याबद्दलचे अधिक माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये यात 3 हजार जागांसाठी भरती करण्यात आलेली आहे या उमेदवारांचा नोकरीचा कार्यकाळ एक वर्षासाठी असणार आहे.