सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी CBIच्या ५ टीम लागल्या कामाला; क्राईम सीन रिक्रिएट करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाचे पथक कामाला लागले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांच्या पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी एक टीम मृत्यूप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी वांद्रे पोलीस स्थानकात पोहचली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील गेस्ट हाऊसवर चौकशी सत्राला प्रारंभ झाला आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला गेस्ट हाऊसवर बोलावून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याठिकाणी त्याची कसून चौकशी होईल. तर सुशांतचा कुक असणाऱ्या नीरज यालाही पाली हिल येथून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआय सर्वप्रथम नीरजचा जबाब नोंदवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार
सुशांतने नेमकी आत्महत्या केली होती की त्याची हत्या झाली हे तपासण्यासाठी सीबीआय टीम सुशांतच्या घरात क्राईम सीन रिक्रिएट करणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी सुशांतच्या वजनाला पुतळा फासावर लटकवला जाईल. जेणेकरून सीलिंग फॅन आणि बेडमध्ये नेमके अंतर किती आहे? सहा फूट उंचीच्या सुशांतचे पाय फासावर लटकताना बेडवर होते की खाली याची सीबीआयला खातरजमा करता येईल. यावेळी फॉरेन्सिक टीमदेखील उपस्थित असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment