अजित पवारांची CBI चौकशी करा; भाजपच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परमविर सिंह यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांना घेरण्याचा भाजप कडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसात भाजप आणि अजित पवार यांची जवळीक वाढत असल्याचा राजकीय चर्चा होत आहेत. मात्र असं असताना अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार आहे.

अनिल देशमुख यांच्या वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी कार्यकारिणीने केली आहे.

Leave a Comment