महाबळेश्वरात CBI चा छापा : कोट्यावधी रूपयांचे पेटींग्ज घेतले ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

महाबळेश्वर येथील वाधवन बंधूंचा बंगल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान यांच्यावर आरोप आहे. CBI चे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह वाधवान याच्या बांगल्यावर हजर झाले आहेत. परदेशी पेंटिंग्ज पोर्ट्रेट सील करून ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या पेंटींग्ज पोर्ट्रेटची किंमत कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाधवान यांच्या बंगल्यात करोडो रुपयांची परदेशी पेंटिंग्ज,पोर्ट्रेट, झुंबर असून या अलीशान बंगल्यामध्ये जिम, स्विमींगपुल, संगमरवराचे मंदिर देखिल आहे. या वस्तू सील करून ताब्यात घेण्यात येणार आहेत. त्यांची किंमत कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते असून त्या कुठून आल्या? कसे आणले याची शहानिशा CBI चे अधिकारी करत आहेत.

महाबळेश्वर येथे 5 एकर परिसरात वाधवान याचा बंगला असून पहिल्या लॉकडाऊन मध्ये वाधवान बंधुनी तत्कालीन प्रधान सचिन अमिताभ गुप्ता यांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता. तेव्हापासून वाधवान बंधू ईडीच्या ताब्यात आहेत. कोरोना काळात महाबळेश्वरात वाधवान बंधूनी केलेला प्रवेश राज्यभर गाजला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणातही आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. सरकारवर भाजपाकडून त्यावेळी अनेक आरोप केले होते.

कोण आहेत वाधवान बंधू?

‘दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड’चे (डीएचएफएल) संस्थापक कपिल आणि धीरज वाधवान बंधूंचा अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंध आणि ‘येस बँके’कडून घेतलेले कर्ज थकित झाल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंग कायद्या अंतर्गत तपास सुरु केला. मिर्ची प्रकरणातही यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. तसेच येस बँक प्रकरणी तपास अद्याप सुरु असतानाच वाधवान बंधूंनी मुंबईबाहेर पळ काढल्याने राज्यात वातावरण ढवळले होते.

Leave a Comment